Thursday, May 3, 2012

charolya


दवात भिजलेली पहाट जेव्हा मी पाहते
तेव्हा मला काळत नाही की
ही नहालेली रात्र आहे की
भिजणारी सकाळ आहे.



एकांत मला खूप आवडतो
कारण मी एकटीच असते
बोलणारी मी असते
आणि  ऐकणारा एकांत असतो.


पावसाने भिजलेली सुष्टीला पाहून
पापण्यांची आठवण येते
डोळे राडतात
पण पापण्यांना मात्र भिजाव लागत.



चांदन्यानी मला माझी ओजळ भरायची आहे
फुलात राहून मला मध चाखायचा आहे.
मरुन मला पुन्हा जगायच आहे
दु:खात सुध्दा सुख शोधायच आहे.



तडजोडीन मला कधी
जगताच आल नाही
म्हणून मला मानस कधी
जोडताच आली   नाही .